अंबरनाथमध्ये चार्जिंगला लावलेल्या आयफोन 6 चा स्फोट, तरुण जखमी

अंबरनाथ: रायगड माझा वृत्त 

आतापर्यंत आपण मेड इन चायना मोबाईल बॅटरीचा किंवा मोबाईलचा स्फोट झालेला ऐकला आहे. मात्र अंबरनाथमध्ये चक्क आयफोन SIXचा स्फोट झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट झाल्यानं अमित भंडारी नावाचा तरुण जखमी झाला.

अंबरनाथ येथील कोहोजगाव भागात राहणाऱ्या अमित याच्याकडे असलेल्या आयफोन कंपनीच्या मोबाईलमध्ये स्फोट झाला. या स्फोटात अमितच्या एका पायाला गंभीर जखम झाली असून दुसरा पायदेखील भाजला आहे. अमित याने मागील वर्षी आयफोन कंपनीचा आय ६ हा मोबाईल अंबरनाथच्या एका दुकानातून विकत घेतला होता. रविवारी एका कार्यक्रमातून घरी आल्यानंतर मोबाईल चार्जिंगला लावला होता. रात्री उशिरा मोबाईलमध्ये काही मेसेज आला आहे का? हे तपासण्या करिता त्याने मोबाईलजवळ घेतला तर त्या अचानक मोबाईलचा अचानक स्फोट झाला. लगेच मोबाईल फेकून दिला आणि आग विझवण्यात आली. या घटनेमध्ये अमितच्या दोन्ही पायांना जखम झाली आहे. जवळपास २६ हजारांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी ऍपल कंपनीकडे तक्रार करणार असल्याचे अमित भंडारी याने सांगितले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत