अजब गावात गजब वरात, नवरीची घोड्यावरून वरात!

बुलढाणा : नितीन कानडजे पाटील

लग्न म्हटले की, डीजेच्या तालावर वाजतगाजत घोड्यावरून निघालेली नवरदेवाची मिरवणूक सर्वांचेच लक्ष वेधून घेते. ही प्रथा सर्वत्र रूढ आहे. मिरवणुकीच्यावेळी नवरदेवाला बसायला घोडा मिळाला नाही तर, रुसवे, फुगवे पाहावयास मिळतात. जणू वरानेच घोड्यावर बसण्याचा मक्ताच घेतला आहे. ही मक्तेदारी मोडीत काढत चक्क नवरीची मिरवणूक घोड्यावर काढल्याचे शेगाव मध्ये पहावयास मिळाले.

शेगाव येथील राजेंद्र चव्हाण यांनी आपली मुलगी नववधू प्रियांका हिची घोड्यावरून वाजत-गाजत मिरवणूक काढली. मुलासमान मुलगीही असते हा भेदभाव न करता या कृतीतून जाधव परिवाराने यांनी समाजाला दाखविले. प्रियांकाचा विवाह २० एप्रिलला थाटामाटात पार पडला. प्रियांकाचा विवाह अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथील नंदकिशोर सोनोने यांचेशी पार पडला. तत्पूर्वी शुक्रवारी सायंकाळी वधू प्रियांकाची घोड्यावरून शहरातून डीजे व सनई चौघड्यांच्या वाद्यात तसेच फटाक्यांच्या आतषबाजीत मिरवणूक काढण्यात आली होती.

चव्हाण परिवाराने हा विवाह अनोख्या पद्धतीने करून समाजापुढे आदर्श ठेवला आहे. समाजाला स्त्री-पुरुष समानतेचा संदेश देत त्यांनी वधू आणि वर दोघांचीही घोड्यावर बसवून शहरातून भव्य मिरवणूक काढली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत