अमोल कोल्हेंना राष्ट्रवादीकडूनच धोका? ; कार्यकर्त्याची बॅनरबाजी

पुणे: रायगड माझा वृत्त

शिवबंधन तोडून हातावर घड्याळ बांधलेले, नाटकातले संभाजी डॉ. अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादीतूनच एका गटाच्या विरोधाला सामोरे जावं लागत आहे. शिरूर मधल्या एक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने ‘अमोल कोल्हे यांना पाडणार’ अशा अर्थाची बॅनरबाजी केल्याने राष्ट्रवादीत खळबळ उडाली आहे.

सागर डुंबरे या व्यक्तीच्या नावाच्या या बॅनरमध्ये लिहिले आहे ”अमोल कोल्हे राष्ट्रवादीतून लढणार असतील तर त्यांना आम्ही आमची ताकद दाखवणार, अडचणीच्या काळात राष्ट्रवादीला साथ देणाऱ्या लांडे यांना उमेदवारी न दिल्याने कोल्हे यांना पाडण्याची भाषाही या बॅनरमध्ये केली आहे”. आता यावर कोल्हे आणि राष्ट्रवादीकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

२०१४साली शिरूरमधून माजी आमदार विलास लांडे यांनी निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विरोधात त्यांना अपयश आले होते. यावेळीही त्यांना उमेदवारी मिळावी याकरिता त्यांचे कार्यकर्ते आग्रही होते. यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी अजित पवारांसमोर घोषणाबाजी देखील केली होती. तर दुसरीकडे कोल्हे यांना अपॆक्षेप्रमाणे उमेदवारी जाहीर झाली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत