आदित्य ठाकरेंना जिंकायची आहेत मतदारांची मनं; ‘जन आशिर्वाद यात्रेतून महाराष्ट्र पिंजून काढणार

मुंबई : रायगड माझा वृत्त 

आगामी विधानसभा निवडणुकीची शिवसेनेने जोरदार तयारी सुरु केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्यावतीने महाराष्ट्राभर ‘जन आशिर्वाद यात्रा’ काढण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘आदित्य संवाद’नंतर शिवसेनेचं दुसरं महत्वाचं पाऊल आहे.

“ज्यांनी मत दिले आहे, त्यांचे आभार मानायचे आहेत, तर ज्यांनी नाही दिली, त्याची मनं जिंकायची आहे” या मथळ्याखाली या जन आशिर्वाद यात्रेचं आयोजन करण्यासत आलं आहे. शुक्रवारपासून आदित्य ठाकरे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघणार असून घराघरात पोहचण्याचा प्रयत्न करणार आहे. येत्या काळात आदित्य ठाकरे शिवसेनेचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असू शकतो त्याचं पार्श्वभूमीवर हा दौरा त्यांच्यासाठी महत्तावाचा असणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याआधीच महाराष्ट्रात विकास यात्रा जाहिर केली आहे. ऑगस्ट महिन्यात फडणवीस ‘फिर एक बार शिवशाही सरकार’ ही विकास यात्रा काढणार आहेत. भाजप आणि शिवसेना दोघेही महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघणार असल्याने या दोन्ही यात्रांना राजकीय महत्त्व प्राप्त झालं आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत