‘आले तर सोबत नाही तर स्वतंत्र’; देवेंद्र फडणवीस विनायक मेटेंवर आक्रमक

बीड : रायगड माझा वृत्त

Related image

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्यात भाजपा विरुद्ध काम करणाऱ्या आमदार विनायक मेटे यांना गर्भित इशारा दिलाय. ‘आले तर सोबत नाही तर स्वतंत्र’ असं म्हणत त्यांनी मेटे यांचे नाव न घेता टीका केली.

राज्यात भाजपा म्हणजे गोपीनाथ मुंडे, त्यांच्यासोबत जे होते त्यांना आम्ही आमच्यासोबत कायम ठेवलंय. मात्र, बीडमध्ये भाजपा विरोधात अन राज्यात सोबत हे चालणार नाही, यायचे तर सोबत य नाहीतर गरज नाही, जे येतील त्यांना सोबत घेऊन आणि जे येणार नाहीत त्यांच्याशिवाय पुढे जाऊ पण विजय नक्की मिळवू असं म्हणत फडणवीसांनी आपण भाजपच्या बीडच्या उमेदवार डॉ. प्रीतम गोपीनाथ मुंडे यांच्या पाठिशी ठाम असल्याचं स्पष्ट केलंय.

शुक्रवारी, बीड -भाजप सेना महायुतीसोबत राज्यात सत्तेत असणारे ‘शिवसंग्राम’चे नेते विनायक मेटे यांनी बीडमध्ये राष्ट्रवादीच्या पारड्यात आपली ताकद टाकण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी मेटेंना हा इशारा दिला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत