इंडोनेशियात पुन्‍हा भूकंप आणि त्‍सुनामीमुळे हाहाकार, ३८४ मृत्यूमुखी

जकार्ता : रायगड माझा ऑनलाईन

इंडोनेशियात पुन्‍हा एकदा भूकंप आणि त्‍सुनामीमुळे हाहाकार माजला आहे. शुक्रवारच्या या प्रलयात आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार मृतांचा आकडा ३८४ वर गेला आहे. मृतांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता असून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.

शुक्रवारी ७.५ रिश्टर स्‍केलच्या शक्‍तीशाली भूकंपानंतर समुद्रात २ मीटर (६.६ फूट) उंचीच्या लाटा आल्या. या त्‍सुनामीमुळे किनारपट्टी भागात मोठे नुकसान झाले आहे. बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. अनेकजण अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. भूकंपानंतर पालू शहरातील विमानसेवा बंद करण्यात आली आहे.

दरम्यान, इंडोनेशियात गेल्या महिन्यातही भूकंपामुळे भीषण हानी झाली होती. ५ ऑगस्‍टच्या भूकंपात ४६० लोकांचा मृत्यू झाला होता. तसेच यापूर्वी २००४ मध्ये इंडोनेशियातील सुमात्रा बेटावर विनाशकारी भूकंप आणि त्‍सुनामी आली होती. यात संपूर्ण हिंदी महासागर प्रभावित झाला होता. भारताच्या तामिळनाडू किनारपट्टी भागातही या प्रलयाने हाहाकार उडाला होता.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत