इम्रान खान यांनी केली मोठी चूक

नरेंद्र मोदी आणि पुतिन यांच्यासमोर इम्रान खान यांनी केली ही चूक VIDEO VIRAL

बिश्केक: रायगड माझा वृत्त 

आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये संकेत आणि शिष्टाचाराला अतिशय महत्त्व असतं. त्या शिष्टाचाराचं पालन करण्याकडे सर्वच राष्ट्रप्रमुखांचा कल असतो. इम्रान खान यांनी मात्र आजच्या उद्घाटन सोहळ्यात या शिष्टाचाराचं भान ठेवलं नाही. त्याचं झालं असं की, उद्घाटन सोहळा सुरू होताना सर्व सदस्य देशांचे प्रमुख एक एक करून आपल्या आसनाजवळ जाऊन उभे राहत होते, आणि येणाऱ्या अध्यक्षांचं स्वागत करत होते.

किरगिझस्तानमधल्या बिश्केकमध्ये शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या (SCO) बैठकीला आजपासून सुरूवात झाली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन, चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यासह अनेक देशांचे नेते उपस्थित आहेत. बैठकीच्या उद्घाटन सोहळ्याला सर्व सदस्य देशांचे प्रमुख उपस्थित होते. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हेही या बैठकीला उपस्थित आहेत. उद्घटन सोहळ्यात शिष्टाचाराला सोडून त्यांनी जी कृती केली त्यावरून इम्रान खान यांच्यावर सोशल मीडियातून जोरदार टीका होतेय.

इम्रान खान सुरुवातीलाच आले. त्यांची खुर्ची रांगेत सर्वात टोकाला ठेवली होती. ते आले आणि आपल्या आसनाजवळ उभे न राहता जाऊन बसले. इतर सर्व नेते मात्र शिष्टाचारानुसार

आपल्या आसनाजवळ उभे राहून येणाऱ्या नेत्याचं स्वागत करत होते. इम्रान खान यांच्या या कृतीमुळे सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. खान यांच्या या कृतीची चर्चा आता सोशल मीडियावर होत आहे.

या आधीही इम्रान खान यांनी अशाच चुका केल्या होत्या. त्यावरही माध्यमांमधून जोरदार टीका झाली होती. पाकिस्तानी माध्यमांमधूनही इम्रान यांच्यावर विविध कारणांमुळे टीका होत  काही दिवसांपूर्वीच इम्रान खान यांच्यावर टीका करण्यास पाकिस्तानात बंदी घालण्यात आलीय. इम्रान खान यांची टिंगल करणं, त्यांच्यावर व्यंग करणं, कार्टुन काढणं यावर बंदी घालण्यात आल्यानंही जोरदार टीका होतेय.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत