इलेक्ट्रिक मोटारीचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू

बुलढाणा: नितीन कानडजे पाटील 

बुलढाणा तालुक्यातील भादोला येथे घरी पाणी भरत असताना विद्युत मोटार सुरु करताना शॉक लागून एका १९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.उमेश प्रल्हाद दिघे असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे.

गुरुवारी सायंकाळी 7 वाजता ही घटना घडली. सायंकाळी 7वाजण्याच्या सुमारास घरी पाण्याचे टँकर मागवून पाणी भरत असताना उमेश मोटार सुरु करण्यासाठी गेला. मोटार सुरु करत असतानाच उमेशला जोरदार शॉक लागला त्यानंतर तातडीने त्याला उपचारासाठी बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आहे. उमेशच्या अशा मृत्यूने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत