उत्तर मुंबईत गोपाळ शेट्टींच्या विरोधात उर्मिला मातोंडकर

मुंबई : रायगड माझा वृत्त

Image result for urmila matondkar news

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर आज त्यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. उत्तर मुंबई मतदारसंघातून भाजपच्या गोपाळ शेट्टी यांच्या विरोधात उर्मिला लढत देतील. त्यामुळे हा मतदारसंघ आता प्रकाशात आला असून तिथे अटीतटीची लढत होईल असे बोलले जात आहे.

याआधी अभिनेता गोविंदाने उत्तर मुंबईतून काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. तेव्हा गोविंदाने भाजपचे बडे नेते राम नाईक यांना मोठ्या मताधिक्याने पराभूत केलं होतं. त्यामुळे यंदा उर्मिला त्याची पुनरावृत्ती करणार की गोपाळ शेट्टी आपला गड कायम राखणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.  दोन दिवसांपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर उर्मिला मातोंडकर यांनी भाजपविरोधात बाण सोडण्यास सुरूवात केली होती. भाजपमुळे देशात असहिष्णूतेचे वातावरण असल्याची तोफ उर्मिला
यांनी डागली होती.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत