उदयनराजेंच्या विरोधात सेनेचे पुरुषोत्तम जाधव

मुंबई : रायगड माझा वृत्त 

भाजपचे खंडाळ्यातील नेते पुरुषोत्तम जाधव यांनी आज पुन्हा शिवसेनेत प्रवेश केलाय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून प्रवेश केलाय. त्यामुळे पुरुषोत्तम जाधव हे राष्ट्रवादीच्या उदयनराजे भोसले यांच्या विरोधात रिंगणात असणार आहेत. या वेळी परिवहन मंत्री दिवाकर रावते, उपनेते आणि कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष नितीन बानूगडे पाटील, आदी उपस्थित होते.

शिवसेनेच्या वाट्याला सातारा लोकसभा मतदारसंघ आल्यानंतर येथून युतीचा उमेदवार कोण याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. शिवसेनेतून ही तीन ते चार जणांनी इच्छुक असल्याचे सांगितले होते. पण या सर्वांना बाजूला ठेऊन उद्धव ठाकरे यांनी भाजपचे नेते पुरुषोत्तम जाधव यांना शिवसेनेत घेऊन त्यांनाच तिकीट देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आज जाधव यांच्या शिवसेना प्रवेश झाला आहे. पूर्वी जाधव हे शिवसेनेत होते पण 2014 च्या निवडणुकीत भाजपची सत्ता राज्यात आल्यावर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. ते भाजप मधून सातारा लोकसभा लढण्यासाठी इच्छुक होते पण त्यांना भाजपकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. तसेच सातारा लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेच्या वाटणीला असल्याने त्यांनी भाजप सोडून शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला.

2009 मध्ये पुरुषोत्तम जाधव यांनी शिवसेनेतून प्रथम सातारा लोकसभा उदयनराजे यांच्या विरोधात लढली होती. त्यांनतर 2014 मध्ये सातारा लोकसभेची जागा भाजपने रिपब्लिकन पक्ष्याला सोडली होती. तेंव्हा देखील पुरुषोत्तम जाधव हे अपक्ष उभे राहिले होते. आता 2019 साठी पुन्हा ते भाजप मधून शिवसेनेत आले असून तिसऱ्यांदा सातारा लोकसभा उदयनराजेंच्या विरोधात लढणार आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत