उमेदवारी अर्ज दाखल करताना तटकरेंचे शक्तीप्रदर्शन; गितेंपुढे आव्हान

 

अलिबाग: मिथुन वैद्य/सुहास तारे

रायगड लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाचे उमेदवार सुनील तटकरे यांनी आपला उमेदवारीअर्ज आज दाखल केला. तटकरे यांनी शक्ती प्रदर्शन करतअर्ज दाखल करून अनंत गीतें पुढे मोठे आव्हान निर्माण केले.

राष्ट्रवादी काँग्रेसने ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे. गेल्यावेळी थोडक्यात हुकलेला विजय यावेळी मिळवायचाच असा निश्चय करून राष्ट्रवादी या निवडणुकीला सामोरे जात आहे. आज राष्ट्रवादी शेकापआणि काँग्रेस महाआघाडीच्या वतीने अलिबागमध्ये मोठे शक्ती प्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल करण्यातआला. यावेळी विजय संकल्पसभेचे आयोजन करण्यात आले. शेकापचे जयंत पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजीआमदार माणिक जगताप, आमदार भास्कर जाधव, आमदार सुरेश लाड, आमदार ध्येर्यशील पाटील, आमदारपंडित पाटील, आमदार भाई जगताप, आमदार संजय कदम, माजी आमदार मधुकर ठाकूर यांच्यासह आघाडीचे सर्वपक्षीय नेते उपस्थित होते.

रायगड लोकसभा मतदारसंघातील सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती पाहता केवळ लोकसभा नाही तर विधानसभेलाषटकार मारत सहाही जागा आघाडी जिंकणार असल्याचा विश्वास सुनील तटकरे यांनी व्यक्त केला. अनंत गीतेंनीकेलेल्या टिकेचाही जयंत पाटील यांनी समाचार घेतला. कट्टर राजकीय शत्रू असलेल्या मधुकर ठाकूर यांचे जयंतपाटील यांनी याच सभेत जाहीर आभार मानले. भास्कर जाधव, माणिक जगताप यांनी आपल्या भाषणातूनतटकरेंचे जोरदार समर्थन केले. एकूणच आघाडीच्या या झंझावातापुढे युतीचे निभाव लागणार का हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरेल.

शेयर करा

One thought on “उमेदवारी अर्ज दाखल करताना तटकरेंचे शक्तीप्रदर्शन; गितेंपुढे आव्हान

  1. तटकरे साहेब निवडून अलेतरच रायगड जिल्हाचा विकास हा चांगल्या प्रकारे होईल तरुण पिढीला रोजगार मिळेल अनेक प्रकारचे उद्योग धंदे अनेक प्रकल्प येतील या रायगड जिल्हात येतील अस मज मत आहे… मज मत फक्त राष्ट्रवादीला म्हणजेच राहुल गांधीला…✌️

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत