उर्मिला मातोंडकरची मुंबईत प्रचाराला सुरुवात; रिक्षा चालवत लोकांना मतदान करण्याची विनंती

मुंबई : रायगड माझा वृत्त

काँग्रेसमध्ये प्रवेश करणारी बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर उत्तर मुंबई मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढणार आहे. उर्मिलानं मुंबईत प्रचारालाही सुरुवात केली आहे. सध्या ती चक्क रिक्षा चालवत लोकांना मतदान करण्याची विनंती करत आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

उर्मिला प्रचारासाठी गोरई परिसरात फिरत होती. तिनं रिक्षा चालकांची भेट घेतली आणि त्यांना मतदान करण्यासाठी आवाहन केलं. इतकंच नव्हे तर तिनं चक्क रिक्षा चालवत आसपासच्या लोकांनाही मतदान करण्यास प्रवृत्त केलं. उर्मिलानं स्वत: हा फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ‘तुम्हाला रिक्षातून कुठं सोडायचंय का? रिक्षा चालक आपल्या मुंबईची जीवनवाहिनी आहे. त्यांना भेटून आनंद झाला’ असंही तिनं फोटोसोबत लिहिलंय.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत उर्मिलानं काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसनं तिला उत्तर मुंबईतून उमेदवारी दिली आहे. भाजपच्या गोपाळ शेट्टींविरोधात तिची लढत असणार आहे. उत्तर मुंबई हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जात आहे. आता काँग्रेसनं उर्मिलाला रिंगणात उतरवून चुरस निर्माण केली आहे.

https://www.instagram.com/p/Bvrh9y5p88y/?utm_source=ig_embed

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत