एकादशीच्या दिवशी मुख्यमंत्र्यांची राजकीय वारी

पंढरपूर: रायगड माझा वृत्त 

एकादशीला विठुरायाच्या पूजेनंतर सकाळी पहिल्यांदा काँग्रेस मधून भाजप मध्ये आलेल्या कल्याणराव काळे यांच्या घरी मुख्यमंत्र्यांनी चहापान घेतले . यावेळी बोलताना काळे यांनी केलेल्या मागण्या पाहता हा चहा आपल्याला फारच महागात पडल्याची मिश्किल कोटी देखील केली .नुकतेच काँग्रेसवासी झालेले राधाकृष्ण विखे पाटील यांचे मार्फत भाजपच्या संपर्कात असलेल्या आमदाराच्या भालके यांचे देखील नाव चर्चेत असल्याने विखे पाटील मुख्यमंत्र्यांना भालके यांच्या निवासस्थानी घेऊन गेले .

विधानसभेचे वारे काही दिवसात वाहू लागणार असल्याने चाणाक्ष मुख्यमंत्र्यांनी आषाढीच्या पंढरपूर दौऱ्यात अनेकांना खुश करण्याचा प्रयत्न करीत राजकीय गणिते मजबूत करण्याचा प्रयत्न केला . आषाढी एकादशीच्या दौऱ्यावर असणारे मुख्यमंत्री दशमीला सोलापुरात उतरले आणि तेथेच काँग्रेस आमदार सिद्धाराम म्हेत्रे आणि आमदार भारत भालके स्वागताला हजार होते . यानंतर पपांढरपूर मध्ये विधानपरिषद आमदार प्रशांत परिचारक यांच्या बाजार समिती मधील कार्यक्रमाला उपस्थिती लावून त्यांनी रात्री परिचारकांकडे भोजनाचा आणि पद्मश्री पद्मजा फेणाणी यांच्या गायनाचा सपत्नीक आस्वाद घेतला .

या कार्यक्रमात माढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे यांची उपस्थिती आश्चर्यकारक होती . याचठिकाणी विजयसिंह मोहिते पाटील यांचेसह जिल्ह्यातील अनेक नेते देखील सहभागी झाले होते . याच कार्यक्रमात माढ्याचे नूतन खासदार रणजित निंबाळकर यांनी बारामतीने नेलेले हक्काचे पाणी परत आणल्याचे सांगत या पाण्याचे वाटप आता सांगोला , माढा पंढरपूरसह गरज असलेल्या भागाला वाटणार असल्याचे सां त बारामतीकरांनाही टोला लगावला .

यावेळी भालके यांनी आपण स्थानिक लोकप्रतिनिधी असल्याने मुख्यमंत्र्यांना निमंत्रण दिल्याचे सांगत काही राजकीय चर्चा करायची असती तर त्या गुप्त बैठकित केली जाते आणि यासाठी मुंबईत भरपूर जागा असल्याचे सांगत सुरु असलेल्या चर्चेला पुष्टी दिली

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत