एक लाखाची लाच मागितल्याप्रकरणी शिवसेनेच्या नगरसेवकाला अटक

डोंबिवली : रायगड माझा वृत्त 

एक लाखाची लाच मागितल्याप्रकरणी मंगळवारी पुन्हा सेनेच्या एका नगरसेवकावर गुन्हा दाखल करण्यात आल्याने सेनेच्या गोटात खळबळ माजली आहे.

गोरख जाधव असे लाखचोरीचा गुन्हा दाखल झालेल्या शिवसेना नगरसेवकाचे नाव आहे. तो अटाळी गावातील प्रभाग क्रमांक 7 मधून निवडून आला आहे. लाचखोर जाधवच्या प्रभागात एका संबंधित कंत्राटदाराच्या कंपनीला महापालिकेकडून रस्ता आणि गटार बांधणीचे काम देण्यात आले होते. या कामामध्ये कोणताही अडथळा न आणण्यासाठी त्याने कंत्राटदाराकडून 1 लाखांची लाच मागितली होती. या प्रकरणी कंत्राटदाराने नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. पडताळणीनंतर त्याला अटक करण्यात आली.

कल्याण-डोंबिवली महापालिकेतील सत्ताधारी युतीचे नगरसेवक लाचखोरीत अव्वल असल्याचे आतापर्यंतच्या आकडेवारीतून समोर आले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत