ऐन सुट्टीत प्रवाशांचा खोळंबा;कोकण रेल्वे ठप्प

भोके:रायगड माझा वृत्त

सध्या उन्हाळ्याची सुट्टी सुरु असून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीय असते. अशा परिस्थितीत कोकण रेल्वेवरील वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांना मनस्तापाचा सामना करावा लागला.

विद्युतीकरणासाठी वापरण्यात येणारे यूटिव्ही मशिन रत्नागिरीजवळ रुळावरुन घसरले. यामुळे गेल्या तासाभरापासून कोकण रेल्वेवरील वाहतूक ठप्प आहे. भोके गावाजवळची ही घटना घडली. मशिन रेल्वे रुळावर आणण्याचे प्रयत्न सुरु असून लवकरच मार्ग सुरळीत होईल, असे कोकण रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.  मात्र, या घटनेमुळे कोकण रेल्वेवरील प्रवाशांचे अतोनात हाल झाले.

कोकण रेल्वेवरील वाहतूक मंगळवारी सकाळी ठप्प झाली असून विद्युतीकरणासाठी वापरण्यात येणारे मशिन रत्नागिरीजवळ रुळावरुन घसरले. यामुळे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या आणि मुंबईवरुन येणाऱ्या गाड्यांचा खोळंबा झाला असून ऐन सुट्टीच्या कालावधीत हा खोळंबा झाल्याने प्रवाशांचे हाल झाले आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत