“कबुतरांपासून सावधान” या सोशल मीडियावरील वायरल पत्रकाने परिसरात घबराट.!

पनवेल : साहिल रेळेकर

पनवेल महापालिकेच्या नावाने “कबुतरांपासून सावधान” अशा संदेशाचे पत्र गेले 2 दिवस व्हॉट्सऍप, फेसबुक, इंस्टाग्राम तसेच अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झाले आहे. या पत्रामुळे पनवेल महानगरपालिका परिसरात मोठ्या प्रमाणात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कबुतरांना पाळून किंवा आपल्या घरासभोवती असणाऱ्या कबुतरांना खायला घालून त्यांच्या संपर्कात येण्याने आता धोक्याचे असून कबुतरांच्या पिसांसह त्यांच्या विष्टेतून बाहेर पडणाऱ्या जंतूंमुळे हायपर सेन्सिटिव्ह न्यूमोनियाचा आजार उदभवण्याचे प्रकार मुंबई, पुणे तसेच इतर ठिकाणी प्रमाण वाढत असून पनवेलमध्येही हा आजार येण्याची शक्यता असुन या आजाराबाबत पनवेलकरांनों सावधान असा संदेश देणारे महापालिकेचे पत्र गुरुवारी सायंकाळपासून सोशलमीडियावर धुमाकूळ घालत घराघरात फिरत आहे.

परंतु विशेष म्हणजे या आजाराविषयी कोणतीही माहिती महापालिकेच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेली नाही असा खुलासा महापालिकेकडून करण्यात आला आहे. त्यामुळे या अफवा पसरवणाऱ्या संदेशावर कोणीही विश्वास ठेवू नये, असे आवाहन पनवेल महापालिकेकड़ून पनवेलकरांना करण्यात आले आहे. या पत्रकामुके नागरिकांमध्ये पनवेल परिसरात चर्चेला उधाण आले होते. अनेकांनी तर थेट डॉक्टरांचे दार ठोठावले आणि सल्ला घेण्यास सुरुवात केली. कबुतरापासून आजार होणार असल्याची  अफवा गेले दोन दिवस वारंवार फिरत असल्याचे दिसले परंतु याबाबत महापालिका प्रशासनाला मात्र कानोकन खबर नसल्याचे समोर आले. त्यामुळे महापालिकेच्या नावाखाली कोणीतरी अफवा पसरवित असल्याचे चित्र स्पष्ट झाले. या घटनेमुळे महापालिकेच्या पत्रकाचा बॅनर वापरुन कोणतीतरी अज्ञातांकडून अफवा पसरविल्या जात असतानाही पालिका प्रशासन सुस्त असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे. तसेच दुसरीकडे असा आजार असल्यास तात्काळ उपाययोजना करणार असल्याचे देखील पनवेल महापालिकेतर्फे सांगण्यात आले आहे.

 

महापालिका अधिकाऱ्यांकडून खुलासा
1) कोट-
कोणत्याही अफवा पसरविणाऱ्या संदेशावर पनवेलकरांनी विश्वास ठेवू नये. सोशल मीडियावर सावधानतेचा इशाराच पत्र फिरत आहे. हे पत्र आमच्याकडून प्रसिद्ध केलेले नाही.

-रमेश निकम
आरोम्य अधिकारी, पनवेल महापालिका

2) कोट –
कबुतरांच्या पिसांसह विष्टेतून बाहेर पडणाऱ्या जंतूमुळे हायपर न्यूमोनिया असा पनवेल महापालिकेच्या नावाने सोशल मीडियावर एक सावधानतेचा इशारा म्हणून पत्र फिरत आहे.
हे पत्र पनवेल महापालिकेने प्रसिद्ध केलेले नाही. मात्र ही अफवा असून आरोग्य अधिकाऱ्यांकडून या आजाराबाबत माहिती आम्हाला मिळाल्यास या आजाराविषयी तात्काळ
उपाययोजना केल्या जातील.

-डॉ. प्रशांत रसाळ
अतिरिक्त आयुक्त, पनवेल महापालिका

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत