कमकुवत मोदी चीनला घाबरले: राहुल गांधी

नवी दिल्ली : रायगड माझा वृत्त 

Image result for rahul gandhi and modi


‘जैश’चा म्होरक्या मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्र संघात फेटाळण्यात आला. फ्रान्सने याबाबतचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्र संघात आणला होता. मात्र, चीनने आपल्या व्हिटोचा वापर करत हा प्रस्ताव फेटाळून लावला. चीनने कायमच मसूदला पाठिशी घातले आहे. २००९, २०१६ आणि २०१७ मध्ये या संदर्भातील प्रस्तावावर चीनने नकाराधिकाराचा वापर करत खोडा घातला होता. यावरून राहुल यांनी ट्विटद्वारे मोदींना लक्ष्य केलं.

भारताविरोधात चीननं केलेल्या कृतीवर मोदींनी एक शब्दही काढला नाही. कमकुवत मोदी चीनच्या शी जिनपिंग यांना घाबरले, अशी टीका राहुल यांनी केली. पंतप्रधान मोदी गुजरातमध्ये शी जिनपिंग यांच्यासोबत झोके घेतात, दिल्लीत गळाभेट घेतात आणि चीनमध्ये त्यांच्यासमोर झुकतात. ही मोदींची ‘चीन नीती’ आहे, असं राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत