काँग्रेसला दिले मत; चुलत भावानेच झाडल्या तीन गोळ्या

हरियाणा : रायगड माझा वृत्त

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मतदान केले हे समजताच स्थानिक भाजपा नेत्याने आपल्या चुलत भावावर गोळीबार केला. हरियाणाच्या झज्जर जिल्ह्यात ही घटना घडली. धर्मेंदर सीलानी असे आरोपीचे नाव आहे. धर्मेंदर सीलानीने राजा सिंह या आपल्या चुलत भावावर एकूण तीन गोळया झाडल्या. त्यातील दोन गोळया पायावर तर एक गोळी पोटात लागली.

राजा सिंहला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता त्याची प्रकृती स्थिर आहे. धर्मेंदर सीलानी फरार असून पोलिसांनी त्याच्या विरोधात हत्येचा प्रयत्न आणि शस्त्रास्त्र कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे. धर्मेंदरने गोळया झाडण्यासाठी जी बंदूक वापरली त्याचा परवाना त्याच्याकडे नव्हता.

धर्मेंदर सीलानी बहाद्दूरगड पालिकेचा माजी सदस्य असून तो भाजपाचा स्थानिक पदाधिकारी आहे. त्याचा मोठा भाऊ हरेंदर सिंह काँग्रेसचा स्थानिक पदाधिकारी असून माजी नगरसेवक आहे. धर्मेंदरने राजा आणि त्याच्या कुटुंबाला भाजपाला मतदान करायला सांगितले होते. रविवारी रात्री मतदानानंतर धर्मेंदर आणि राजामध्ये वादावादी झाली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत