कार्यक्रम भूमिपूजन आणि उदघाटनाचा; निशाणा मात्र स्थानिक राजकारणावर

पेण : सुनील पाटील 

पेण नगर पालिकेच्या विविध विकास कामाचे भूमिपूजन आणि उदघाटन करताना शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी स्थानिक आमदार धेर्यशील पाटील यांना लक्ष केले .

पेण पालिकेच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि उदघाटन आज रायगड जिल्ह्याचे खासदार तथा केंद्रीय अवजड मंत्री अनंत गीते तसेच पालकमंत्री रविंद्र चव्हाण,पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, माजी मंत्री रविशेठ पाटील, नगराध्यक्षा प्रितम पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर जैन आदी मान्यवरांच्या हस्ते पार पाडण्यात आले. माजी मंत्री रवीशेठ पाटील यांच्या विनंतीवरून मुख्यमंत्र्यांनी पेणच्या विकासासाठी भरीव निधी दिल्याचे सांगण्यात आले.

यावेळी बोलताना पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी राज्य आणि केंद्र सरकार विकासाचे राजकारण करते तर येथील लोकप्रतिनिधी विकासाच्या विरोधात संघर्ष करण्याचेच काम करत असल्याचे सांगत पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी आमदार धेर्यशील पाटील यांचे नाव न घेता त्यांच्यावर तोफ डागली. देशातील व राज्यातील पारदर्शक विकासाकडे लक्ष केंद्रित करूनच देशाशी आपले असणारे नाते लक्षात घेऊन आगामी निवडणुकीत मतदान करा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. आमची बांधिलकी पेण शहराच्या विकासासाठी आहे. कोणी किती प्रयत्न केले तरी पेण शहराच्या विकासासाठी आमचे असलेले योगदान कोणी नानारु शकत नसल्याचे सांगताना पेणच्या नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी नाट्यगृह आणि रिंगरोड साठी निधी देण्याची मागणी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली. एकूणच विकासकांच्या उदघाटनाची निमित्ताने सुरु झालेले राजकारण पुढे कसे वळण घेते हे पाहणे महत्वाचे ठरेल.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत