कासारवाडीत खासदार बारणे यांची सर्वसामान्य नागरिकांशी चर्चा

पिंपरी : रायगड माझा वृत्त
कासारवाडी येथे भेटीगाठी दौरा करत असताना शिवसेना-भाजप-रिपाई-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी सर्वसामान्य नागरिकांशी चर्चा केली. चर्चेत नागरिकांच्या स्वास्थ्य आणि अन्य बाबींची खासदार बारणे यांनी विचारपूस केली.
कासारवाडी येथील भेटीगाठी दौ-यात नगरसेवक माऊली थोरात, मनोज बोरसे, रमाकांत लांडगे, देवदत्त लांडगे, बाळासाहेब लांडगे, रतन लांडगे, गणेश संभेराव, गणेश लांडगे, भाऊसाहेब लांडगे आदींच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी आमदार गौतम चाबुकस्वार, शहराध्यक्ष योगेश बाबर, पिंपरी चिंचवड शहर संघटिका उर्मिला काळभोर, पिंपरी विधानसभा संघटिका सरिता साने, उपविभाग संघटिका शैला पाचपुते, विभाग प्रमुख शैला निकम, किरण मोटे, सुरेश गादिया, प्रकाश जवळकर, सुनील लांडगे, संतोष टोणगे आदी उपस्थित होते.
कासारवाडी परिसरातून भेटीगाठी दौरा सुरू असताना खासदार श्रीरंग बारणे एका हातगाड्याकडे वळले. गाड्याच्या बाजूला बसलेल्या अब्दुल समद शेख यांच्या हातात हात देत त्यांची विचारपूस केली. या अचानक केलेल्या भेटीमुळे उपस्थितांना आश्चर्याचा धक्का बसला. खासदार बारणे यांनी ‘क्या शेख कैसे हो?’ असे विचारताच अब्दुल शेख यांना भरून आले. अत्यंत तळागाळातील नागरिकांशी व्यक्तिगत स्तरावर खासदार बारणे हे सर्वश्रुत असल्याचा यानिमित्ताने पुन्हा एकदा प्रत्यय आला.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत