कोकण रेल्वेच्या विविध समस्या मार्गी लावण्यासाठी सुनील तटकरे यांचे प्रयत्न

रोहा: महादेव सरसंबे 

कोकण रेल्वेच्या अंतर्गत येणाऱ्या विविध प्रश्नांवर रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी कोकण रेल्वेच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालकांशी भेट घेतली आहे. यावेळी सुनील तटकरे यांनी कोकण रेल्वेच्या विविध समस्या आणि प्रलंबित प्रश्नांवर या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा केली.

लोकसभा निवडणुकीनंतर रायगडचे खासदार सुनील तटकरे हे कामाला लागले आहेत. त्यांनी काल कोकण रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत कोकण रेल्वेच्या अंतर्गत समस्यांवर चर्चा केली. यामध्ये प्रामुख्याने प्रवाशांची सुरक्षा, जलद गाडयांना थांबा, स्थानकाची उंची वाढवणे, तसेच जिथे रेल्वे फाटक असेल तिथे उड्डाण पूल उभारणे किंवा त्याठिकाणी अन्य पर्यायी व्यवस्था निर्माण करणे अशा विविध प्रश्नांसह प्रकल्पग्रस्थांच्या समस्या यावेळी सुनील तटकरे यांनी कोकण रेल्वेचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांच्यासमोर मांडल्या. दरम्यान या भेटीवेळी कोकण रेल्वे या सर्व मागण्या आणि समस्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहे आणि त्या तात्काळ मार्गी लावण्यासाठी संबधित अधिकाऱ्यांना तशा सूचना देखील लवकर देण्यात येईल असे आश्वासन कोकण रेल्वेचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी खासदार सुनील तटकरे आणि त्यांच्यासोबत असलेल्या शिष्ठमंडळाला दिले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत