गुंगीचे औषध देऊन घर मालकाला लुटून चोराचा पोबारा

पिंपरी : रायगड माझा वृत्त 

रंगरंगोटी मुळे दीपक यांच्या दोन मुली कोथरुड येथील घरी होते. त्यांना आणण्यासाठी दीपक यांच्या पत्नी अर्चना या सकाळी कोथरुड येथे गेल्या होत्या. अर्चना व मुली मंगळवारी दुपारी साडे तीन वाजता घरी आले. तेव्हां काशिनाथ नेरकर त्यांची पत्नी सुमनबाई व दीपक हे झोपलेले होते.  घर कामासाठी नव्याने राहण्यास आलेल्या नेपाळी दांपत्याने एअरफोर्स मधील ग्रुप कॅप्टनसह त्याच्या आई – वडिलांना जेवणातून गुंगीचे औषध देऊन बंगल्यातील दागिने व रोकडसह पोबारा‌ केला. पिंपरी महेश नगर येथील समीर बंगल्यात मंगळवारी (११ जून) हा प्रकार घडला.

काशिनाथ महादू नेरकर (७७), सुमनबाई काशिनाथ नेरकर (६७), ग्रुप कॅप्टन दीपक काशिनाथ नेरकर (४९) या तिघांना जेवणातून गुंगीचे औषध देऊन लुटण्यात आले आहे. या प्रकरणी दीपक यांच्या मुलीने पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दीपक यांची प्रकृती स्थिर असून, त्यांच्या आई वडिलांवर कमांड हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत. पोलिस निरीक्षक रंगनाथ उंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, काशिनाथ नेरकर यांचा समीर हा मुलगा एअरफोर्स मध्ये असताना शहीद झाला आहे. त्यांच्या नावाने काही वर्षांपूर्वी समीर हा बंगला बांधण्यात आला आहे.

काशिनाथ नेरकर हे हिंदुस्थान अँटिबायटिक्स कंपनीतून निवृत्त झाले आहेत. तर दीपक हे स्टडी लिव्ह वर पुण्यात आले आहेत. समीर या बंगल्याची रंगरंगोटी आणि डागडुजीचे काम सध्या सुरू आहे. त्यातही आरोपी नेपाळी दाम्पत्य मागील महिन्याच्या २८ तारखेला या बंगल्यात राहण्यासाठी आले. घरातील स्वयंपाक आणि अन्य काम हे दाम्पत्य करीत होते.

तेव्हां घरकाम करणारे नेपाळी दाम्पत्य देखील घरात नसल्याचे तसेच कपाट आणि बंगल्याचे मागील दार उघडे असल्याचे अर्चना यांच्या लक्षात आले. दागिने आणि पैसे कपाटात नसल्याचे तसेच पती, सासू सासरे यांना खाण्यातून काहीतरी घातल्याने समजल्याने अर्चना यांनी पोलिसांना घटनेची माहिती कळवली. पोलिसांनी तत्काळ नेरकर यांच्या घरी धाव घेतली. तिघांना सुरवातीला महापालकेच्या वायसीएम हॉस्पिटल दाखल केले. तेथून तिघांना कमांड हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे. पिंपरी पोलिस आणि गुन्हे शाखा तपास करीत आहेत.

अनेक दिवसांचे काम सुरू असल्याने दमून झोपले‌ असतील असे समजून दीपक यांच्या पत्नी अर्चना आणि मुलींनी त्यांना उठवले नाही. तसेच या तिघी देखील झोपल्या. पाच वाजता अर्चना व मुली झोपेतून उठल्या. चहा करण्यासाठी नेपाळी महिलेला बोलविण्यासाठी गेल्या. तेव्हा आऊट हाऊस बंद दिसले. त्यानंतर सात वाजले तरी दीपक आणि सासू सासरे उठत नाही म्हणून अर्चना यांनी प्रथम पती दीपक यांना उठवले. तेव्हा दीपक यांनी देखील डोके गरगरत असल्याचे सांगितले. तसेच सुमनबाई आणि काशिनाथ हे उठत नव्हते. सुमनबाई या स्वच्छता गृहात जाताना पडल्या.

नेपाळी‌ दांपत्याने नेरकर कुटुंबाला लुटण्यापूर्वी पिंपरीत एका ठिकाणी शॉपिंग केली. या दांपत्याने पळून जाताना कोणताही सुगावा मागे सोडलेला नाही. त्यांचे पहिले नाव आणि मोबाईल नंबर एवढीच माहिती नेरकर कुटुंबाला आहे. त्यामुळे आरोपी नेपाळी दाम्पत्याला शोधण्यात पोलिसांना अडथळे येत आहेत. मात्र, नेरकर यांच्या नातीला घरात नवीन कपड्याचा एक टॅग सापडला. तिने तो पोलिसांना दिला त्यावरून दुकानाचे नाव समजले असून, त्यावरून तपासाला दिश्या देण्याचा पोलिस प्रयत्न करीत आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत