गृहमंत्र्यांकडून दुसऱ्या सर्जिकल स्ट्राईकचे संकेत

मुजफ्फरनगर : रायगड माझा ऑनलाईन 

पाकिस्तानच्या सीमेत घुसून सर्जिकल स्ट्राईक करण्यात आली होती. या घटनेला दोन वर्ष पूर्ण झाल्याच्या घटनेवर आता आणखी एक मोठी बातमी समोर आलीये. गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानमध्ये मोठ्या हल्ल्याचे संकेत दिले आहे. याबद्दल बीएसएफचे महानिर्देशक केके शर्मा यांनीही दजोरा दिलाय.शुक्रवारी उत्तरप्रदेशमधील मुजफ्फरनगर इथं झालेल्या एका कार्यक्रमात गृहमंत्री राजनाथ सिंह हजर होते. 

बीएसएफच्या जवानासोबत पाकिस्तानने जे काही केलं, ते तुम्ही पाहिलं असावं. हे लक्षात घेऊन सीमेवर काही तरी घडलं. मी सांगणार नाही. पण ठीक-ठाक झालंय. विश्वास ठेवा, सगळं काही व्यवस्थितीत झालंय. दोन-तीन दिवसांपूर्वी हे झालंय.

गृहमंत्री म्हणाले की, “मी आपल्या जवानांना सांगितलं होतं, तुम्ही गोळ्या झाडू नका, जर पलीकडून एक गोळी झाडली गेली तर मग तुम्ही किती गोळ्या झाडल्यात याची मोजणी करू नका.”

बीएसएफमधल्या सूत्रांनुसार, भारताकडून सीमेपार जोरदार गोळीबार आणि तोफांचा हल्ला झाला. त्यात पाक सैन्याचं मोठं नुकसान झाल्याचं कळतंय. १८ सप्टेंबर रोजी बीएसएफ जवान नरेंद्र सिंह शहीद झाले. त्यांना ३ गोळ्या मारून पाकिस्तानी सैनिकांनी त्यांचा गळा चिरला होता. त्याचाच बदला भारतानं घेतल्याचा दावा राजनाथ यांनी केला.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत