गॅलेक्सी ग्रुपच्या संचालकांना अटक

पुणे: रायगड माझा वृत्त 

सतीशचंद्र मिश्रा (वय ६५), रामकृष्ण दुबे (५८, दोघेही रा. संतकबीरनगर, खलिलाबाद, उत्तर प्रदेश) अशी अटक आरोपींची नावे आहेत. राज्य गुन्हे अन्वेषण विभाग व उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथक यांनी संयुक्तरीत्या ही कारवाई केली.राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अपर पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर गुन्ह्यातील फरारी आरोपींची माहिती घेतली. यानंतर उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी व राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे भरारी पथक यांनी आरोपींना जेरबंद केले.

या गुन्ह्यातील इतर आरोपी प्रमोदकुमार गंगा पांडे, अमोदकुमार पांडे, घनश्याम कालीप्रसाद पांडे, मैफतुल्लाखान अब्दुलमजीद खान, रहेफिरदौस आफताब अहमद सिद्दीकी, सतेंद्र वशिष्ठ त्रिपाठी (रा. सर्व उत्तर प्रदेश) यांचा शोध सुरू आहे.कंपनीविरोधात राज्यातील वर्धा, नागपूर, अकोला, यवतमाळ, वाशीम, अमरावती, चंद्रपूर, बीड, लातूर, ठाणे, कोल्हापूर, रत्नागिरी, भंडारा येथे गुन्हे दाखल असून, याप्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले आहे. यानुसार राज्य गुन्हे अन्वेषण विभाग तपास करीत होते. तपासकामी अनेकदा उत्तर प्रदेशात पथके पाठवली होती. अखेर त्यांना ताब्यात घेण्यात आले.

जादा परताव्याचे आमिष दाखवून ठेवींच्या माध्यमातून ७ कोटी ८ लाख ४९ हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी गॅलेक्सी ग्रुप ऑफ कंपनीच्या दोन संस्थापक संचालकांना लखनौ येथे अटक करण्यात आली. हे दोघे गेल्या २० वर्षांपासून फरार होते. गॅलेक्सी ग्रुप ऑफ कंपनीने केलेल्या आर्थिक घोटाळ्यांसंदर्भात राज्यात २६ गुन्हे दाखल असून, या गुन्ह्यांचा तपास महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभाग करीत आहे. कंपनीविरुद्ध महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यांतदेखील गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई गुन्हे अन्वेषणचे पोलीस उपमहानिरीक्षक (आर्थिक गुन्हे) जािंलदर सुपेकर, पोलीस अधीक्षक (आर्थिक गुन्हे) पल्लवी बर्गे, अपर पोलीस अधीक्षक (भरारी पथक) नरेंद्र गायकवाड, पोलीस उपअधीक्षक विलास भोसले, पोलीस निरीक्षक भास्कर पुल्ली, यशवंत निकम, हवालदार कृष्णकांत देसाई, दत्तात्रय भापकर यांनी प्रयत्न केले.

गॅलेक्सी ग्रुप ऑफ कंपनीअंतर्गत पाच वेगवेगळ्या कंपन्यांची उत्तर प्रदेशातील कानपूर येथे नोंद करण्यात आली होती. राज्यात या कंपनीच्या १०२ शाखा होत्या. अधिक परताव्याचे आमिष दाखवून लोकांकडून कंपनीने कोट्यवधी रुपयांच्या ठेवी स्वीकारल्या होत्या. यातील कुठलीही रक्कम परत न करता ७ कोटी ०८ लाख ४९ हजार २६६ रुपयांचा अपहार केला. तसेच, कंपनी बंद करून आरोपी पसार झाले. आरोपींना नागपूर येथील न्यायालयात हजर केले असता, पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाली. दरम्यान, गुन्ह्यात आतापर्यंत ४ कोटी ८६ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे, अशी माहिती देण्यात आली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत