गोव्यात भाजपविरोधात लोकसभेच्या दोन्ही जागा लढवणार: संजय राऊत

पणजी : रायगड माझा वृत्त 

गोव्यात भाजपविरोधात लोकसभेच्या दोन्ही जागा लढवणार, खासदार संजय राऊत यांची घोषणा

महाराष्ट्रात भाजपसोबत युती असली तरी शिवसेना गोव्यात भाजपविरोधात लोकसभेच्या दोन्ही जागा शिवसेना लढवणार असल्याची घोषणा खासदार संजय राऊत यांनी केली आहे. पणजी येथील आयोजित पत्रकार परिषदेत राऊत बोलत होते. शिवसेनेच्यावतीने उत्तर गोव्यातून राज्यप्रमुख जितेश कामत तर दक्षिण गोव्यातून उप राज्यप्रमुख राखी प्रभुदेसाई नाईक निवडणूक लढवणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे.

गोव्यात लोकसभेबरोबर विधानसभेच्या तीन जागांवर पोटनिवडणुका होणार आहेत. त्यातील मांद्रे विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक शिवसेना लढवणार असून लवकरच उमेदवार जाहीर केला जाईल, असं राऊत म्हणाले. मागील विधानसभा निवडणुकांवेळी शिवसेनेने सुभाष वेलिंगकर यांच्या गोवा सुरक्षा मंचसोबत युती करून निवडणुका लढवल्या होत्या. यावेळी गोवा सुरक्षा मंचने तिन्ही पोटनिवडणुकांचे उमेदवार जाहीर केले आहेत.असे असले तरीआज किंवा उद्या वेलिंगकर यांच्याशी चर्चा करून सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न करणार असल्याचंही राऊत यांनी सांगितलं.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत