ग्रामसेवकच्या बदलीवरून इंदापूर पंचायत समितीमध्ये वादावादी

विजय शिंदे: इंदापूर

ग्रामसेवकाच्या बदलीवरून इंदापूर पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी आणि पंचायत समितीच्या सदस्यांमध्ये वाद झाल्याची घटना घडली आहे. या वाद विकोपाला गेल्यानंतर पंचायत समितीच्या सदस्याने कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.

पंचायत समितीच्या कार्यालयात पंचायत समितीचे सदस्य बाळासाहेब काळे यांनी गटविकास अधिकारी माणिकराव बिचकुले यांना ग्रामसेवकांच्या बदिलीवरून प्रश्न विचारले होते. त्यांच्या प्रश्न विचारण्यावरून या दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. त्यांच्या या बाचाबाचीनंतर बाळासाहेब काळे आणि पळसदेव ग्रामपंचायतीचे सदस्य मेघराज कुचेकर यांनी पंचायत समिती समोर ठिय्या आंदोलन सुरू केले.

दरम्यान हा वाद सुरु असताना इंदापूर पंचायत पंचायत समितीचे सभापती करणसिह घोलप आणि राष्ट्रवादी कॉग्रेसचे तालुकाअध्यक्ष महारुद्र पाटील,पंचायत समिती सदस्य सतिश पांढरे यांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवण्यासाठी प्रयत्न केले. पंचायत समितीमध्ये अनेक वेळा ग्रामसेवक आणि विभागाचे प्रमुख नेमताना वाद होत असतात,परंतु हे वाद लोकहिताचे नाहीत असे मत नागरिकांतून व्यक्त होत आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत