चाकणमध्ये कारची दुचाकीला जोरदार धडक, 5 जणांचा जागीच मृत्यू

road accident in chakan 5 death 2 injured

रायगड माझा वृत्त

भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने चाकणमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकीवरील 3 तर कारमधील 2 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.चाकणमधील खालूब्रे रस्त्यावर मंगळवारी रात्री उशिरा कार आणि दुचाकीदरम्यान अपघात झाला.

यामध्ये एकूण पाच जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातात ठार झालेले काहीजण हे चाकणच्या औद्योगिक वसाहतीत काम करत असल्याची माहिती आहे. चंद्रशेखर सूरज लाला विश्वकर्मा, सुनील परमानंद शर्मा, दीपनारायण हरिवंश विश्वकर्मा , सत्यवान पांडे, सर्वज्ञ संजय विश्वकर्मा अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत.या भीषण अपघातात दोन जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.दरम्यान, या अपघातामुळे चाकण परिसरात शोककळा परिसरात शोककळा पसरली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत