जगभरात फेसबुक, इन्स्टाग्राम झाले डाऊन; नेटीझन्स नाराज

मुंबई : रायगड माझा वृत्त 

Related image

जगभरात लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साईट फेसबुक आणि इन्स्टाग्रामची सेवा विस्कळीत झाल्याचे पहायला मिळत आहे. फेसबुक वापरताना अडचणी येत असल्याने युजर्सनी ट्विटरवर आपली नाराजी व्यक्त केली. काल संध्याकाळी फेसबुकची सेवा विस्कळीत झाल्याचे पहायला मिळाले. जगभरातील अनेक युजर्सना फेसबुक लॉगिन करताना तसेच फेसबुकवर पोस्ट करताना अडचणींचा सामना करावा लागत होता. ‘Facebook is Down for required maintenance’ असं नोटिफिकेशन लॉगिन करताना दिसत होते. फेसबुकसोबतच इन्स्टाग्रामवरही फोटो अपलोड करताना युजर्सला अडचणी येत होत्या.

आज सकाळी देखील अनेक युजर्सनी फेसबुक, इन्स्टाग्राम सोबत व्हॉट्सअॅपची सेवाही विस्कळीत झाल्याची तक्रार ट्विटरवर केली आहे. ट्विटरवर #FacebookDown, #instagramdown हॅशटॅग सध्या ट्रेण्डिंग आहेत. बुधवारी सकाळी गुगल ड्राईव्ह आणि यूट्युबची सेवा देखील काही काळासाठी विस्कळीत झाली होती. जगभरात अनेकांना गुगल ड्राइव्ह आणि युट्यूबवर फाईल्स, व्हिडीओ अपलोड करताना अडचणी येत होत्या.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत