जमीन हडप केल्याप्रकरणी धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

 

रायगड माझा वृत्त

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर अडचणीत आले आहेत. सरकारी जमीन हडप केल्याप्रकरणी धनंजय मुंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. तर या प्रकरणाशी धनंजय मुंडे यांचा संबंध नसल्याचे त्यांच्या वकिलांनी सांगितले आहे.

सरकारी जमीन हडप केल्याप्रकरणी धनंजय मुंडे यांच्याविरोधात राजाभाऊ फड यांनी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याने त्यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. या याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली असता हायकोर्टाने धनंजय मुंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहे. हायकोर्टाने तपास अधिकाऱ्याच्या भूमिकेवरही ताशेरे ओढले आहेत. पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर हायकोर्टाने हा निर्णय दिल्याने धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. सत्ताधाऱ्यांकडून या प्रकरणावरुन मुंडे यांची कोंडी केली जाण्याची शक्यता आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत