जम्मू कश्मीरच्या बारामुल्लामध्ये जैशच्या टॉप कमांडरचा खात्मा

श्रीनगर: रायगड माझा वृत्त 

बारामुल्लामधील बोनियारच्या बुजथलन भागात शनिवारी सकाळी दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये झालेली चकमक अजूनही सुरू असल्याचे वृत्त आहे. त्यात सुरक्षा दलाला दहशतवादी कमांडरला ठार करण्यात यश आले असून अजूनही कारवाई सुरू आहे. सुरक्षा दलाने परिसरात शोधमोहीम हाती घेतली आहे.

जम्मू कश्मीरच्या बारामुल्लामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये शनिवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाने जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा टॉप कमांडर लुकनामचा खात्मा केला आहे. तो पाकिस्तानातील असून जैशचा टॉप कमांडर असल्याचे सांगण्यात आले. बारामुल्लामध्ये अजूनही चकमक सुरू असून शोधमोहीम राबवण्यात येत आहे.

जैशचा लुकनाम कमांडर दक्षिण कश्मीरमधून उत्तर कश्मीरकडे जात होता. पाकिस्तानातून घुसखोरी करून हिंदुस्थानात आलेल्या दहशतवाद्यांवर घातपाताची जबाबदारी देण्यासाठी तो जात होता. याची माहिती सुरक्षा दलाला मिळाल्यावर शोधमोहीम हाती घेण्यात आली. त्यावेळी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबाराला सुरूवात केली. प्रत्युत्तरादाखल सुरक्षा दलाने केलेल्या कारवाईत जैशच्या कमांडरचा खात्मा करण्यात आला.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत