जसप्रीत बुमराह जगातील सर्वोत्कृष्ट गोलंदाज-सचिन तेंडुलकर

मुंबई: रायगड माझा वृत्त

जसप्रीत बुमराहने आयपीएलच्या १२व्या सीझनमध्ये १६ सामन्यांमध्ये १६ विकेट्स घेतल्या आहेत. त्याची इकॉनॉमी ६.६३ इतकी असून त्याचं अत्ंयत कौतुक केलं जातं आहे. अंतिम सामन्यात मुंबईने १४९ धावा करून चेन्नईसमोर १५० धावांचाच लक्ष्य ठेवलं होतं. या सामन्यात बुमराहने केवळ १४ धावा देत २ विकेट्स घेतल्या. बुमराहने चेन्नईच्या धावांची घोडदौड रोखल्यामुळे अत्यंत चुरशीच्या सामन्यात चेन्नईचा केवळ एका धावेने पराभव झाला.

जसप्रीत बुमराह हा आजच्या घडीला जगातील सर्वोत्कृष्ट गोलंदाज आहे. तो सध्या जितकं उत्कृष्ट खेळतो आहे त्याहूनही उत्तम तो येत्या काळात खेळेल. त्याची सर्वोत्कृष्ट खेळी पाहायला अजून वेळ आहे असं विधान सचिन तेंडुलकरने केलं आहे. आयपीएल १२च्या फायनलमध्ये मुंबई इंडियन्स चेन्नईला हरवत विजेतेपद पटकावलं असून जसप्रीत बुमराह या विजयाचा शिल्पकार ठरला आहे.

सामना संपल्यानंतर युवराज सिंहने सचिन तेंडुलकरची मुलाखत घेतली. त्यावेळी बुमराहच्या गोलंदाजीचे कौतुक करत तोच जगातील सर्वोत्कृष्ट गोलंदाज असल्याचं सांगितलं.

बुमराहने या सामन्यात गोलंदाजीची एक रणनीती आखली होती. प्रत्येक चेंडू तो विचारपूर्वक टाकत होता. ‘ मी सामना संपेपर्यंत अत्यंत संयम राखला. हा सामना चुरशीचा होणार हे मला आधीपासूनच माहित होतं. त्यामुळे एकही क्षण तोल ढळू दिला नाही. प्रत्येक पाऊल विचारपूर्वकच उचललं’ असं बुमराहने सांगितलं आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत