जालन्यात अमेरिकन बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूस बाळगणारे दोन जण पोलिसांच्या ताब्यात

जालना : रायगड माझा वृत्त

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर स्थानिक गुन्हे शाखेने शहरातील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. जालना शहरातील रामनगर कॉलनीत अमेरिकन बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतूस बाळगणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

नीलेश भिकाजी भिंगारे असं पकडण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शुक्रवारी रात्री अचानक भिंगारेच्या घरावर छापा टाकत घराची झडती घेतली. यावेळी पोलिसांना अमेरिकन बनावटीचे पिस्तूल सापडले. भिंगारेनेही आपल्याकडे पिस्तूल असून ते मित्राकडे ठेवल्याची कबुली दिली. त्याच्या माहितीवरून पोलिसांनी त्याचा मित्र शेख हकीम उर्फ पप्पू शेकला मंठा चौफुलीमधून अटक केली. त्याच्या घराची झाडाझडती केल्यानंतर घरात अमेरिकन बनावटीचे एक पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस सापडले. नीलेश भिंगारे आणि शेख हकीम (पप्पू) या दोघाला स्थानिक शाखेने अटक केली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही कारवाई केली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत