ज्ञानपीठ पुरस्कार विजते गिरीश कर्नाड काळाच्या पडद्याआड … 

८१ व्या वर्षी बंगळूरात निधन

१९ मे १९३८ ला माथेरानला जन्म 

मुंबई : रायगड माझा वृत्त

ज्ञानपीठ आणि पद्म पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ अभिनेत गिरीश कर्नाड यांचं आज१० जून रोजी निधन झालं. दीर्घ आजाराने बंगळुरुत वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. गेले अनेक दिवस ते आजारी होते. गिरीश कर्नाड यांचा जन्म माथेरान येथे झाला होता .

भारतीय नाट्यसृष्टी आणि चित्रपटसृष्टीतील अग्रणी असलेले नाव म्हणजे गिरीश कार्नाड. भारतीय कलेला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त करून देणारे आणि भारतीय रंगभूमीच्या प्रवाहाला नवे वळण देण्यात कार्नाड यांचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे. संगीत नाटक अकादमी, साहित्य अकादमी, ज्ञानपीठ, पद्मभूषण अशा अनेक सर्वोच्च पुरस्कारांनी गौरविले गेलेले गिरीश कार्नाड त्यांच्या त्यांच्या साहित्य ,नाट्य आणि अभिनयासाठी रसिकांच्या दीर्घकाळ स्मरणात राहतील .दिग्दर्शक, पटकथाकार, अभिनेता म्हणून चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या गिरीश कार्नाड  यांचा जन्म १९ मे १९३८ रोजी माथेरान येथे झाला

गिरीश कर्नाड यांच्या रुपाने एक चतुरस्त्र व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेलं आहे. तुघलक, नागमंडल, हयवदय या नाट्यकृतींचं दिग्दर्शनही गिरीश कर्नाड यांनी केलं होतं. गिरीश कर्नाड यांचा पद्म आणि ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मान झाला आहे.

८१ वर्षीय गिरीश कर्नाड हे कन्नड भाषिक लेखक, अभिनेते, दिग्दर्शक होते. दाक्षिणात्य चित्रपटांसोबत बॉलिवूडमध्येही त्यांनी ठसा उमटवला होता. कर्नाड यांना १९७४ मध्ये पद्मश्री, १९९२मध्ये पद्मभूषणने सन्मानित करण्यात आलं होतं. १९९४ मध्ये त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला होता. १९९८ मध्ये कर्नाड यांना ज्ञानपीठ पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. ययाति, तुघलक, हयवदन यासारखी त्यांनी लिहिलेली कन्नड नाटकं गाजली.
गिरीश कर्नाड यांना दहावेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त झाला होता. टायगर जिंदा है, चॉक अँड डस्टर, शिवाय यासारख्या हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केली आहे. ‘उंबरठा’ या स्मिता पाटील यांची मुख्य भूमिका असलेल्या मराठी चित्रपटातही त्यांनी काम केलं होतं.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत