डॉ आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष स्वच्छता मोहीम

अलिबाग मध्ये  ४४टन कचरा गोळा करण्यात आला

अलिबाग प्रमिला जोशी

पद्मश्रीआणि देशाचे स्वच्छता दूत  डॉ आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आज डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतीष्ठानच्या वतीने  सर्वत्र विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली . 

डॉ आप्पासाहेब धर्माधिकारी  यांचा १४ मे  ला  वाढदिवस आहे  या वाढदिवसाचे औचित्य साधून समाजातील प्रत्येक नागरिकाला स्वच्छेतेचे महत्व पटावे आणि सर्वांचे आरोग्य निरोगी राहावे या हेतूने संपूर्ण महाराष्ट्रासह विविध भागात सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आज डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतीष्ठानच्या वतीने  हि विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली .
या मोहिमेचा भाग म्हणून अलिबाग शहरातील सर्व शासकीय कार्यालये ,शासकीय दवाखाने ,बस डेपो ,भाजी मार्केट ,मच्छीमार्केट ,समुद्र किनारा आदी ठिकाणी स्वच्छता करण्यात आली . अलिबाग शहरात १७ शासकीय कार्यालयांची सुमारे ४६ किलोमीटर लांबीच्या रस्त्याची दुतर्फा स्वच्छता करण्यात आली . या मोहिमेत ४४३४ स्वयंसेवकांनी सहभागी होऊन ७४ हजार चौरस मीटर क्षेत्रातील ४४ टन कचरा गोळा केला . या मोहिमेत शासकीय कर्मचारी , लोकप्रतिनिधी , पत्रकार यांच्यसह नागरिक देखील सहभागी झाले होते
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत