तांत्रिकी बिघाडाने हार्बर रेल्वे सेवा विस्कळीत

मुंबई : रायगड माझा वृत्त

हार्बर रेल्वे मार्गावर तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल वाहतूक ठप्प झाली आहे. कॉटनग्रीन-शिवडीदरम्यान एक लोकल गाडी थांबली आहे. त्यामुळे पनवेलहून  सीएसएमटीच्या दिशेने जाणारी वाहतूक रखडली आहे. सकाळी सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली. ऐन गर्दीच्या वेळेस हि घटना घडल्याने सर्व चाकरमान्यांचे हाल होत आहेत. रेल्वेचे तंत्रज्ञ घटनास्थळी दाखल झाले असून तांत्रिक बिघाड दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत