तालुक्यातील सर्वं तलाव भरण्याची इंदापूर कॉग्रेसची मागणी

इंदापूर: विजय शिंदे 

पुणे शहरात चांगला पाऊस पडत असला तरी इंदापूर तालुका अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहे. खडकवासला धरण १००% भरल्याने खडकवासला धरणांतून इंदापूर तालुक्यातील लहान-मोठे १८ तलाव आणि नीरा डावा कालव्यातून ६ तलाव भरण्याची इंदापूर तालुका कॉग्रेसने मागणी केलीय. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूरच्या तहसीलदारांना यासंदर्भातील निवेदन देण्यात आलेय.

इंदापूर तालुक्यातील पाण्याची परस्थिती लक्षात घेता शेती,जनावरांना चारा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. पावसाळा सुरु होऊन दिड महिन्याच्या कालावधी निघून गेला परंतु पाऊस पडत नसल्याने शेतकरी हवालदिल झालाय. खडकवासला धरण १००% भरल्याने इंदापूर तालुक्यातील तलाव भरण्यात यावे. त्याचबरोबर नीरा डावा कालव्यातून इंदापूरला पाणी सोडण्यात यावे अशी मागणी कॉग्रेसच्या निवेदनात करण्यात आली. कॉग्रेसचे तालुका अध्यक्ष कृष्णाजी यादव, बाजार समितीचे माजी सभापती मयूरसिंह पाटील, दुध संघाचे चेरमन मंगेश पाटी यांनी इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मेटकरी यांना मागण्यांच निवेदन दिले. तसेच यावेळी केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलचे दर कमी करावेत, शेतकऱ्यांना पीक कर्ज वेळेत मिळावे या मागण्या देखील करण्यात आल्या आहेत.

 

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत