‘दादा, मी प्रेग्नंट आहे’ होर्डिंगचं गुपित अखेर उलगडलं!

मुंबई : रायगड माझा वृत्त 

मुंबई-पुण्यात लागलेल्या ‘दादा, मी प्रेग्नंट आहे’ या होर्डिंगबाबत अनेकांनी तर्कवितर्क लढवले होते. मात्र आता या होर्डिंगचं गुपित अखेर उलगडलं आहे. ‘दादा, मी प्रेग्नंट आहे’, हे होर्डिंग एका नाटकाच्या प्रमोशनचं आहे. यामधील आणखी एक धक्कादाखक बाब म्हणजे या होर्डिंगचा संबंध अभिनेत्री प्रिया बापटच्या ‘गुड न्यूज’शी आहे.

प्रिया बापट नाट्यरसिकांसाठी “दादा, एक गुड न्यूज आहे” हे नवंकोरं नाटक घेऊन येत आहे. या नाटकाचं पोस्टर नुकतंच सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलं. या नाटकात उमेश कामत आणि हृता दुर्गुळे हे जोडी भाऊ-बहिण म्हणून दिसणार आहे.’दादा मी प्रेग्नंट आहे’, मुंबईसह पुण्यात होर्डिंगची चर्चा उमेश या नाटकामध्ये एक साधं नॉर्मल आयुष्य जगणारा, खंबीर, कर्तव्याची जाण असलेला आणि बहिणीवर विशेष प्रेम असणाऱ्या भावाची भूमिका निभावत आहे. तर हृता ही कॉलेजला जाणारी, आयुष्य एन्जॉय करणारी आणि भावावर जीवापाड प्रेम करणारी अशी बहीण साकारत आहे. ऋताचे हे रंगभूमीवरील पहिलेच व्यासायिक नाटक आहे.

काही दिवसांपासून दादरच्या प्रभादेवी आणि पुण्यातील कर्वे रोडच्या डेक्कन टी पॉईंट इथे ‘दादा, मी प्रेग्नंट आहे’, हे होर्डिंग पाहायला मिळत आहे. या होर्डिंगमागचा उद्देश स्पष्ट होत नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. त्यातच प्रिया बापटने चार दिवसांपूर्वी ‘एक गुड न्यूज आहे,’ अशी पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली होती. त्यामुळे प्रिया बापट आणि उमेश कामत यांच्या घरी नवा पाहुणा येणार असल्याची चर्चा रंगू लागली.

‘कुणीतरी येणार गं’, प्रिया-उमेशच्या घरी लवकरच नवा पाहुणा!मात्र आता या होर्डिंगचा आणि प्रिया बापटच्या पोस्टचा संबंध असल्याचं समोर आलं आहे. ‘दादा, मी प्रेग्नंट आहे’ हे होर्डिंग प्रिया बापटच्या ‘दादा, एक गुड न्यूज आहे’ या नाटकाच्या प्रमोशनसाठी लावलं आहे.परंतु प्रिया बापटच्या ‘एक गुड न्यूज आहे’ पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव करणाऱ्या चाहत्यांचा काहीसा भ्रमनिरास झाला आहे.

 

View this post on Instagram

 

तर ही आहे गुड न्यूज! सोनल प्रोडक्शन्ससह आमची पहिली निर्मिती. खूप मनापासून, प्रेमाने जपलेली आणि वाढवलेली ही पहिली कलाकृती लवकरच तुमच्यापर्यंत घेऊन येतोय. आजपर्यंत अभिनेते म्हणून तुम्ही आमच्यावर खूप प्रेम केलंत, तसंच आमच्या या नव्या प्रवासाला सुध्दा तुमचं प्रेम आणि आशीर्वाद मिळू देत. This is the ‘GOOD NEWS’. This is our baby. There is no greater happiness than producing and supporting the content that you believe in. Umesh and I have been blessed with tremendous love and support from our family, friends and fans over the years. We wish to seek your blessings for this new journey. Wish us all the luck and shower your love upon this one too! #DadaEkGoodNewsAhe

A post shared by Priya Bapat (@priyabapat) on

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत