दारूच्या नशेत केली पोलीसठाण्याच्या हद्दीतील आठ वाहनांची तोडफोड;एकाला पकडण्यात यश दोघे फरार

पुणे : रायगड माझा वृत्त

पिंपरी-चिंचवड शहरात अज्ञातांनी काल रात्री सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उभ्या असलेल्या आठ वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली आहे.यात टेम्पो आणि इतर वाहनांचा समावेश होता.त्यांनी सिमेंट ब्लॉकने आणि दगडाने वाहनांच्या काचा फोडल्या आहेत.रात्री दारूच्या नशेत असताना हे सर्व कृत्य केल्याच समजतय.हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅॅमेऱ्यात कैद झाला असून एका आरोपीला पकडण्यास पोलिसांना यश आले आहे.आरोपी गणेश खरात अस ताब्यात घेण्यात आलेल्या भाच्याचे नाव असून त्याचा सख्खा मामा आकाश धुडातमल आणि चुलत मामा योगेश हे फरार आहेत. त्यांचा शोध सांगवी पोलीस घेत आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत