दिशा पटानीसोबत आदित्य ठाकरेंचा डिनर? सोशल मीडियावर फोटो व्हायरल

रायगड माझा वृत्त 

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी यांचा एकत्रित फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दिशा पटनी आणि आदित्य ठाकरे डिनरला गेले होते, अशी चर्चा आहे.

खरंतर दिशा पटानीचं नाव कायमच अभिनेते जॅकी श्रॉफ यांचा मुलगा अभिनेता टायगर श्रॉफ याच्यासोबत जोडलं गेलं. मात्र, या दोघांनी कधीच त्यांच्यातील नात्याला दुजोरा दिला नाही. त्यामुळे सोशल मीडियावरील चर्चा केवळ ‘गॉसिप्स’च राहिली. आता आदित्य ठाकरेंसोबत डिनरला गेल्याने दिशा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आदित्य ठाकरे सध्या राजकारणात अधिक सक्रीय झाले आहेत. शिवसेनेच्या दैनंदिन कामात, निर्णय प्रक्रियेत आदित्य ठाकरे सहभागी होत असताना आता ते निवडणुकीला उभे राहण्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. मात्र आदित्य ठाकरे आणि दिशा पटानी यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने, नव्या चर्चेला उधाण आलं आहे. एरवी राजकीय गोष्टींमुळे चर्चेत राहणाऱ्या आदित्य ठाकरे यांचीही आता दिशासोबत नाव जोडलं जात असल्याने वेगळ्या चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. दरम्यान, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे किंवा अभिनेत्री दिशा पटानी यांनी स्वत:हून पुढे येऊन अजून या फोटोबाबत स्पष्टीकरण दिले नाही. त्यामुळे यातील कुणी या व्हायरल होणाऱ्या फोटोबाबत बोलतं, की या चर्चांकडे दुर्लक्ष केलं जातं, हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत