दुपारपर्यंत १०९२२ कर्जतकरांचे मतदान

दुपारपर्यंत १०९२२ कर्जतकरांचे मतदान

कर्जत : अजय गायकवाड 

कर्जत नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. सकाळपासूनच मतदार आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येत होता. थेट नगरध्यक्षपदासाठी चुरशीची लढत असल्याने दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते झपाटून कामाला लागल्याचे चित्र दिसत आहे.
निवडणूक चुरशीची असली तरी शांततेत मतदान होत आहे. पोलीस यंत्रणा देखील सज्ज आहे. कर्जत हे तालुक्याचे ठिकाण असल्याने दोन्ही पक्षाचे ग्रामीण भागातून उत्साही कार्यकर्ते देखील शहरात दाखल झाले आहेत. दुपारी दीड वाजेपर्यंत ४७. ७७ टक्के मतदान झाले. यामध्ये ५ हजार २०५ महिलांनी तर ५ हजार ७१७ पुरुषांनी मतदान केले. ज्या पद्धतीने दोन्ही पक्षांनी प्रचार केला ते पाहता मतदारांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे दिसून येत आहे.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत