“दुष्काळ हेच एक कलियुग”केवळ सूड घेण्यासाठी टाकले विहरीत विष

ऐन पाणी टंचाईत केवळ आसुयेपोटी विहिरीत कालविले विष मनमाड : रायगड माझा वृत्त 

राज्यावर सध्या पाणी टंचाईचे संकट आहे. नाशिकच्या नांदगाव आणि मनमाड परिसरात तर पिण्याच्या पाण्याची समस्या मोठी आहे. ग्रामीण भागात तर विहिरींनी तळ गाठल्याने हंडाभर पाण्यासाठी महिला आणि आबालवृद्धांना पायपीट करावी लागत आहे.

या परिस्थितीला कंटाळून केवळ सूड घेण्यासाठी पिण्याच्या पाण्याच्या विहिरीत विष  कालविल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. नाशिक जिल्ह्याच्या  नांदगाव तालुक्यातील  साकोरा गावात ही घटना घडली आहे.  पाणी टंचाईमुळे माणूस किती खालच्या पातळीला जाऊ शकतो याचे भीषण वास्तव यानिमित्ताने पुढे आले आहे.

अनेक शेतकऱ्यांनी विहिरीतील पाणी पिण्यासाठी साठवून ठेवले आहे. त्यावर ते स्वत:सोबत जनावरांची तहान भागवतात. नांदगाव तालुक्यातील साकोरा गावातील शेतकरी  शांताराम बोरसे यांनी आपल्या मालकीच्या विहिरीत पिण्यासाठी पाणी साठवून ठेवले होते. मात्र अज्ञात समाज कंटकांनी केवळ आसुयेपोटी चक्क विहिरीच्या पाण्यात विषारी औषध टाकून पाणी खराब करून माणुसकीला काळिमा फासण्याचा प्रकार केला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत