देवबाग : समुद्र खावळ्याने समुद्रा लगतच्या वस्त्यांना बसला मोठा तडाखा

मालवण : रायगड माझा वृत्त

सोसाट्याच्या वाऱ्यासह खवळलेल्या समुद्राचा जोरदार तडाखा देवबागला बसला. येथीळ ख्रिश्‍चन वाडीतील दोन घरांना पाण्याने वेढा घातल्याने स्थानिकांमध्ये घबराट पसरली.देवबाग संगम येथील जमीन समुद्राने गिळंकृत केली असून शवदाहिनी वाहून गेली आहे. यात आनंद कुमठेकर यांच्या होडीचे लाटांच्या तडाख्यात नुकसान झाले.

समुद्राने रौद्ररूप धारण केल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कालपासून सुरू झालेल्या सोसाट्याच्या वाऱ्याचा जोर आज मोठ्या प्रमाणात वाढला होता. समुद्र खवळल्याने पाण्याच्या पातळीत वाढ झाली. याचा मोठा फटका देवबाग गावास बसला. तर काही घरांमध्ये पाणी घुसले.जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर, पंचायत समिती सदस्य मधुरा चोपडेकर, मकरंद चोपडेकर, मनोज खोबरेकर, पंच सदस्य फिलसू फर्नांडिस, निहीता गावकर, नागेश चोपडेकर, रमेश कोद्रेकर, जॅक्सन फर्नांडिस, आनंद तारी यांच्यासह अन्य ग्रामस्थांनी घटनास्थळी भेट देत नुकसानीची पाहणी केली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत