धक्कादायक; सेक्सला नकार दिल्याने महिलेची हत्या

ठाणे : रायगड माझा वृत्त

सेक्सला नकार दिल्याने एका २५ वर्षीय तरुणाने महिलेची हत्या केली आहे. भिवंडीतील शांती नगर परिसरात ही घटना उघडकीस आली आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. कोर्टासमोर हजर केल्यानंतर कोर्टाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे.

२५ वर्षीय तरुणाचे एका विवाहित महिलेसोबत शारिरीक संबंध होते. या महिलेला दोन मुले आहेत. एक दीड वर्षाचा तर दुसरा अवघ्या २५ दिवसांचा मुलगा आहे. आरोपी हा गेल्या काही दिवसांपासून महिलेच्या घरी वारंवार येत होता. या दोघांमध्ये अनैतिक संबंध होते, अशी माहिती आम्हाला तपासादरम्यान कळली आहे, असे पोलिसांनी सांगितले. आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सेक्सला नकार दिल्याने मी तिची हत्या केल्याची कबुली आरोपीने दिल्याचे शांती नगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र मायने यांनी दिली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत