नदीपात्रात वाढ झाल्याने अजस्त्र मगरींचे दर्शन, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

रायगड माझा वृत्त 

सध्या सांगली जिल्ह्यातील चांदोली आणि कोयना धरण क्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे नदीपात्रातील पाणी पात्राबाहेर गेलेय. त्यामुळे आश्रयासाठी मगरी या काठावर आल्याचे पहायला मिलातायेत. आज हरिपूर येथे रेस्क्यू टीमला नदीच्या काठावर दोन अजस्त्र मगरी पहुडलेल्या निदर्शनास आल्या. तब्बल १२ ते १५ फूट लांबीच्या असणाऱ्या या मगरी निदर्शनास आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

नदीपात्रात वाढ झाल्याने अजस्त्र मगरींचे दर्शन, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

आयर्विन पुलावरून नदीमध्ये उडी घेत आत्महत्या केलेल्या तरुणीच्या मृतदेहाचा शोध घेण्यासाठी रेस्क्यू टीमची तीन दिवसांपूर्वी शोध मोहम सुरु होती. यावेळी हरिपूर जवळ कृष्णेच्या काठी दोन १२ ते १५ फुटी मगर त्यांच्या निदर्शनास आली. या मगरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने काठावर पहुडलेल्या असल्याचं बोललं जात आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नागरिकांना नदीकाठी न जाण्याचे आवाहन विभागाकडून करण्यात आलं आहे. गेल्या काही वर्षात नदीपात्रात मगरीकडून होणारे हल्ले वाढले आहेत. त्यात हरिपूर येथील कृष्णा आणि वारणा नदीच्या संगमाच्या ठिकाणी दोन अजस्त्र मगरींचे दर्शन झाल्याने ग्रामस्थामध्ये मोठे भीतीचे वातावरण आहे. त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी या गावांतून होत आहे. मागील 15 वर्षात मगरीच्या हल्ल्यात 10 बळी आणि 12 जण जखमी झाले आहेत. त्यामुळे वन खात्याने या मगरींचा कायमचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत