नितेश राणेंचं रामदास कदमांना उत्तर देताना वादग्रस्त ट्विट

मुंबई : रायगड माझा वृत्त 

Image result for nitesh rane

पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या टीकेला उत्तर देताना आमदार नितेश राणे यांनी वादग्रस्त ट्विट केलं आहे. नितेश राणे यांनी रामदास कदम यांना थेट श्वानाचीच उपमा दिली आहे.

कोकणातील रामदास कदम विरुद्ध राणे हा वाद सर्वश्रुत आहे. रामदास कदम यांनी एका कार्यक्रमात राज्यसभा खासदार नारायण राणे यांच्यावर जहरी टीका केली होती. त्यानंतर राणेंचे सुपुत्र नितेश यांनीही आता वादग्रस्त ट्विट करत उत्तर दिलं आहे.

नारायण राणे यांची शिवसेनेवर बोलण्याची लायकी नसल्याची टीका पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केली. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात रामदास कदम यांनी नारायण राणेंवर शाब्दिक हल्लाबोल केला.

‘नारायण राणे आधी काँग्रेसमध्ये गेले त्यानंतर भाजप झालं. आता आठवलेंचा पक्ष बाकी आहे,’ असा टोलाही कदम यांनी राणेंना लगावला. ज्या शिवसेनेच्या जीवावर नारायण राणे यांनी हे वैभव कमावलं त्या राणेंची ‘मातोश्री’वर बोलण्याची औकात आहे का, असंही कदम म्हणाले. तसंच नारायण राणे म्हणजे कोकणाला लागलेला काळा डाग आहे. हा डाग रामदास कदम धुतल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा रामदास कदम यांनी दिला.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत