पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे आपल्या देशाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर-अनंत गीते

मुरूड जंजिरा:-अमूलकुमार जैन

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे आपल्या देशाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचले आहे. बलशाली भारत बनवायचा असेल तर देशाचे नेतृत्व हे नरेंद मोदींकडे असणे खूप आवश्यक असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे केंद्रीयमंत्री अनंत गीते यांनी रोहा येथिल जाहीर सभेत केले.

रोहा येथे शिवसेना, भाजप, आर पी आय, रासप पक्षाच्या वतीने कार्यकर्त्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी गीतें बोलत होते, यावेळी व्यासपिठावर पालकमंत्री रविंद्र चव्हाण, नविद अंतुले, कामगार नेते सूर्यकांत महाडीक, शिवसेना नेते सुल्तान मुकादम, भाजपा नेते अ‍ॅड. महेश मोहिते, सुवर्णा करंजे, संपर्क प्रमुख सदाभाऊ थरवळ, रवि मुंढे, किशोर जैन, समीर शेडगे, अ‍ॅड. मनोजकुमार शिंदे, अल्पसंख्याक अध्यक्ष उस्मान रोहेकर, आदी भाजपा सेनेचे मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी आपल्या भाषणात अनंत गीते म्हणाले कि, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे आपल्या देशाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचले आहे. बलशाली भारत बनवायचा असेल तर देशाचे नेतृत्व हे नरेंद मोदींकडे असणे खूप आवश्यक आहे.आपल्या महाराष्ट्रात सिंचन घोटाळा घडल्यामुळे शेकडो शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागली आहे. परंतु हाच पैसे जर सिंचनात लागू केला असता तर बहुतांशी क्षेत्र ओलिताखाली येऊन शेतकरी सुजलाम सुफलाम झाला असता. परंतु ज्यांनी जल सिंचनात भ्रष्टाचार केला आहे शेतकरी कुटुंबाचे शाप त्यांना भोवल्याशिवाय राहणार नाही सुनील तटकरे यांच्यावर ७२ हजार कोटी जलसिंचन प्रकरणातले मुख्य संशयित आहेत. तसेच त्यांच्यावर मनी लॉन्डरिंगचा खटला सुद्धा सुरु आहे. बेनामी कंपन्या काढून शेतकऱ्यांच्या जमिनी कवडी मोल किमतीने विकत घेतल्या. तसेच आपल्या सहकाऱ्यांना फसविण्याचे ज्यांनी काम केले आहे अश्या भ्रष्टचारी व विश्वासघातकी व्यक्तीस रायगड लोकसभा मतदार संघातील जनता कदापि खासदार म्हणून निवडून देणार नाही तर अश्या व्यक्तीला धडा शिकवण्यासाठी २३ एप्रिल या मतदानाची वाट पाहत असल्याचे प्रतिपादन यावेळी गीते यांनी केले. यावेळी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी आमच्या शासनाने दिलेला विकास निधी, तटकरें त्यांनीच स्वता आणल्याचा खोटे सांगतात, आपण विकास पुरुष असल्याचे भसवतात मात्र सुनिल तटकरे यांनी फक्त त्यांच्या कुटूंबियांचा विकास केला आहे, लोकांचा विकास ते करु शकत नाही.

रोहा तालुका प्रमुख समीर शेडगे यांनी लोकांच्या प्रश्नांची आपल्याला जाण आहे, हा समीर शेडगे लोकांची कामे करतो, ती पुर्ण करण्यासाठी पाठपुरावा करतो, माझ्याकडे जे कोणी येतात, त्यांचे प्रश्न समजुन घेवुन त्यांना मदत करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असतो, गीतें सहेब माझ्या सर्व प्रश्नांची दखल घेतात, कुणाला आरोग्य मदत, तर कुणाला शिफारस, कुणाला रस्ता, तर कुणाला नोकरी, प्रश्न काहीही असोत, लोकांच्या कामांना गीतें साहेब नेहमी प्राधान्य देतात. आजवर कधीही त्यांनी मला निराश केलेला नाही. तरी गावातल्या लोकांना विनंती करितोआपला मत एका प्रामाणिक, सरळमार्गी सज्जन आणि स्वच्छ चारित्र्याच्या उमेदवाराला दया, अनंत गीतें सहेबांना दया, गीतें साहेबांच्या वतीने हा समीर शेडगे तुमच्यासाठी 24 तास उपलब्ध असेल, हा माझा रोहेकर जनतेला शब्द असल्याचे समीर शेडगे यांनी सांगितले. अनंत गीते यांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला. या प्रचार सभेस मोठ्या संख्येने रोहेकरांनी उपस्थिती लावली होती.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत