पार्थ पवार यांना कर्जत यामध्ये धोक्याचा इशारा

कर्जत  :  अजय गायकवाड
कर्जत मधील सभेत आज पार्थ पवार यांना  धोक्याचा इशारा मिळाला . अपेक्षित गर्दी न झाल्याने  चिडलेल्या अजित दादांनी चुकीची आकडेवारी दिल्याच्या कारणावरून थेट व्यासपीठावरूनच नेत्यांना तंबी दिली .
राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी खुद्द अजित पवार आता मावळच्या रिंगणात उतरले आहे. उरण आणि पनवेल मध्ये कमकुवत असलेल्या राष्ट्रवादीची सारी भिस्त शेतकरी कामगार पक्षावर अवलंबून आहे. मात्र कर्जतच्या सभेत शेतकरी कामगार पक्षाचे  स्थानिक पुढारीच  अनुपस्थित होते. शेतकरी कामगार पक्षाचे उर्वरित रायगड जिल्ह्यात एक धोरण आणि कर्जत मध्ये वेगळे धोरण हे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे  . जेमतेम  कार्यकर्त्यांसमोर बोलताना ओठात एक आणि पोटात एक अशी भूमिका न ठेवण्याचे अजितदादांनी  आवाहन केले. आजची सभा अचानक ठरली आणि लग्नाचा मुहूर्त असल्याचे कारण कमी उपस्थितीसाठी  देण्यात आले.  कर्जतच्या रॉयल गार्डन लॉन  वर झालेल्या यया सभेसाठी आमदार सुरेश लाड , पार्थ पवार ,उमेश पाटील प्रशांत पाटील आयडी उपस्थित होते
     यावेळी अजित पवारांना कर्जत विधानसभा मतदारसंघाची  मतदार संख्या आणि मतदान केंद्राची आकडेवारी देण्यात  आली . मात्र यामध्ये तफावत आढळल्याने अजितदादांनी थेट व्यासपीठावरच कार्यकर्त्यांची खरडपट्टी काढत शिस्तीचे  डोस पाजले.
सातत्याने दोन निवडणुका जिंकणाऱ्या शिवसेनेचे आव्हान पार्थ पवार कसे पेलणार असा सवाल करताच अजून पार्थ पवार अधिकृत उमेदवार जाहीर झाले  नसल्याचे अजित पवार यांनी  यावेळी  माध्यमांशी बोलताना सांगितले. एकीकडे अजित पवार यांनी जरी असे सांगितले असले तरी  सभेच्या ठिकाणी लावलेल्या बॅक ड्रॉप वर पार्थ पवार यांची छबी स्पष्टपणे झळकत होती. पक्षाचे कोणतेही पद  नसलेल्या व्यक्तीचा असा फोटो  कसा काय लावला याविषयी मात्र कोणताही खुलासा होऊ नाही. एकूणच कर्जतची सभा पार्थ पवार याना धोक्याची इशारा देणारी ठरली .
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत