पाहटे साडेतीनच्या सुमारास जुगार अड्ड्यावर पोलिसांचा डाका;१५ आरोपी अटक

नांदेड : रायगड माझा वृत्त

नांदेड शहराच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या श्रावस्ती नगर परिसरात एका मोकळ्या भूखंडावर टीन पत्र्याच्या घरात झन्ना मन्ना नावाचा जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिस अधीक्षक संजय जाधव यांना मिळाली.त्यांनी आपले पथक कार्यरत केले.पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे यांनी मोठा फौजफाटा सोबत घेऊन बुधवारी १२ जून रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास श्रावस्ती नगरातील या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. पोलिस दिसताच अनेकांनी अड्यावरून धूम ठोकली. तरी १५ आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले.

घटनास्थळावरून रोख ८० हजार, पंचेचाळीस हजाराचे मोबाईल आणि काही दुचाकी असा अडीच लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.या कारवाईमुळे शिवाजीनगर गुन्हे शोध पथकाच्या कार्यप्रणालीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पोलीस अधिक्षक याबाबत काय निर्णय घेतात तो येणारा काळच सांगेल. या प्रकरणी शिवप्रकाश मुळे यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत