पुण्यात स्वारगेटजवळ आढळली दोन भुयारं

पुणे : रायगड माझा ऑनलाईन

पुणे मेट्रोचं काम सुरु असताना स्वारगेटजवळ भुयार आढळली!

पुणे शहरात ठिकठिकाणी मेट्रोचं काम सुरु असताना स्वारगेटजवळ एक भुयार आढळलं आहे. स्वारगेटला मल्टीमोडल हब उभारणीचं काम वेगाने सुरु आहे. त्यासाठी पायलिंग मशीनद्वारे खोदकाम सुरु असताना 12 ते 15 फुटांवर भुयारी मार्ग सापडला आहे.

स्वारगेट ते शिवाजीनगर इथल्या अॅग्रीकल्चर कॉलेजसाठी मेट्रोच्या भुयारी मार्गाचं काम सुरु होतं. पायलिंग मशीनच्या साहाय्याने जमिनीमध्ये खड्डा खोदण्याचं काम सुरु होतं. तेवढ्यात बस स्टॉपजवळची जमीन खचली आणि तिथे सुमारे 8 ते 10 फुटांचा खड्डा पडला. मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी या खड्ड्यात उतरुन पाहणी केली असता, तिथे पूर्व आणि पश्चिम दिशेसह उत्तरेकडे भुयार जात असल्याचं आढळंले.

दगडी बांधकाम असलेलं हे भुयार 50 ते 60 मीटर लांबीचं असावं, असं म्हटलं जात आहे. भुयार नेमकं केव्हा बांधलं, याची खात्रीलायक माहिती मिळू शकलेली नाही. मात्र भुयारांचं बांधकाम पाहता ते 30 ते 35 वर्ष जुनं असल्याचा अंदाज अभियंत्यांनी वर्तवला आहे.दरम्यान, भुयारं सापडल्यानंतर मेट्रोचं काम थांबवण्यात आलं आहे.यापूर्वी पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातही ब्रिटिशकालीन भुयारी मार्ग सापडला होता. विद्यापीठाच्या मुख्य इमारतीत हा भुयारी मार्ग आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत