प्रभू रामचंद्र हे मुस्लिमांचे देखील पूर्वज : बाबा रामदेव

नडियार : रायगड माझा ऑनलाईन 

Image result for baba ramdev

योग गुरू बाबा रामदेव यांनी ‘राम हे केवळ हिंदुचे नाहीत तर, मुस्लिमांचे देखील पूर्वज’ असल्याचं विधान केलं आहे. गुजरातमधील नडियार शहरामध्ये संतराम मंदिरामध्ये आयोजित योग शिबीरामध्ये सहभागी होण्यासाठी बाबा रामदेव आले होते. त्यावेळी त्यांनी हे विधान केलं आहे.

मक्का – मदिनेला राम मंदिर बांधणार का?’

राम मंदिर आणि राजकारण याचा काहीही संबंध नाही. राम मंदिर अयोध्येमध्ये नाहीतर मक्का – मदीना आणि व्हॅटीकन सिटीमध्ये बांधणार का? असा सवाल बाबा रामदेव यांनी यावेळी केला. तसेच ‘राम हे केवळ हिंदुंचे नाहीत तर, मुस्लिमांचे देखील पूर्वज आहेत’ असं विधान देखील बाबा रामदेव यांनी केलं आहे. दरम्यान, काँग्रेसकडून केवळ राजकीय फायदा घेण्यासाठी राम मंदिराच्या मुद्द्याचं राजकारण केलं जात असल्याचं बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत